वावटळ ( भाग १ )
. पहाटे फटफटलं पण नव्हतं . झुंजूमुंजू होण्याच्या आधी , माणसांची वर्दळ सुरु होण्याच्या खूप आधी ; वस्तीवरच्या सर्व बाया आपले प्रातर्विधी आटोपून घ्यायच्या . त्यानंतर बाप्येलोक ! पोरंबाळ कधीही , कुठेही ; नालीशी , गटाराच्या काठाशी , शेताच्या बांधाशी ! अलिखित नियम होता तो ! हौसा नेहमीप्रमाणे , एका बोटाने दाताला मिसरी लावत , दुसऱ्या हातात टमरेल धरून शेताच्या कडेने चालली होती . गुरांसाठी रचलेल्या चाऱ्याच्या गंजी पाशी . तिला काहीतरी वळवळताना दिसलं . स्वाभाविक उत्सुकतेने , तिने जवळ जाऊन निरखून पाहिलं . पटकूरावर एक पोर हातपाय उडवत पडलं होतं . काही दिवसांचं असेल . कोणीतरी बाई , पोराला इथे निवाऱ्याला ठेवून शेतापलीकडे गेली असेल , असं वाटून हौसा थोडावेळ तिथेच थांबली . वस्तीवर तर कोणीच ओली बाळंतीण नव्हती . म्हणजे ही जी कोणी बाई होती ती बाहेरून आली असणार !
. विझत चाललेल्या चांदण्यांच्या मंद प्रकाशात ते पोर मजेत होतं . हौसा निरखून पाह्यला लागल्यावर पोर हातपाय उडवायचं थांबलं आणि टुकूर टुकूर तिच्याकडे पाह्यला लागलं . बोळकं वासून हसायला लागलं . थोडावेळ वाट पाह्यल्यावर हौसाने अस्वस्थ होऊन हाळी दिली , " कोन हाय रं ? कुनाच प्वार हाय हितं ? " तो पर्यंत आणखीन चार दोन बाया बाजूला गोळा झाल्या होत्या . हौसानं पोर उचललं . पोरगी होती . बिलगलीच तिला . वाट पाहून तिथंच चार जणांना सांगून , हौसा तिला आपल्या झोपडीत घेऊन आली .
. गावकुसाबाहेर असलेलं हे महात्मा नगर . पत्र्याच्या , गवताच्या , कामटयांच्या झोपड्या . समोर गोठे . तिथली बहुतेक माणसं त्या गोठ्यातच काम करणारी होती . शेणामुताचा वास , शेणपाण्याचे चर ! काही गवताच्या पेंढ्या , गोठ्यातच पोटमाळ्यावर टाकलेल्या . तर उरलेल्यांच्या बाहेर गंजी रचलेल्या . एका बाजूला उसाचे मळे , भाज्यांचे वाफे , शेतं पसरलेली . त्याच गोरगरिबांच्या वस्तीत , हौसाच्या रिकाम्या झोपडीत , ही नखा एवढी पोर आली आणि त्या झोपडीचं नंदनवन झालं . हौसाने आपलं सर्व अतृप्त मातृत्व तिच्यावर उधळलं . तिला शोधत कोणी येऊ नये अशीच हौसाची तीव्र इछ्या होती . तिने नवस केलेले सर्व देव तिला पावले . तिच्या हाकेला ओ देऊन धावत आले . पोरीला शोधायला कधीही , कोणीही आलं नाही . जणू काही ती पोर आकाशातूनच पडली होती .
. ती अशक्त पोर हळूहळू वाढू लागली . स्वप्नातही कल्पना करता येणार नाही असं रूप होतं तिचं . कुणाची पोर होती कोण जाणे , पण विलक्षण देखणी होती . लहानपणापासून नाचायची आवड . हौसानेपण स्वतःचं पोट भरेल आणि म्हातारपणी आपली काठी होईल म्हणून सर्व शक्य होत्या त्या तर्हांनी तिची -- कुसुमची -- नृत्याची हौस भागवली . गावातलीच एक कलावंतीण तिला नाच शिकवत होती .गावात तमासगीरांची पालं पडली की दिवस रात्र कुसुम त्यांच्यातच वावरायची . उपजत आवडीने मिळेत ते शिकत होती . उफाड्याच्या कुसुमने दहाव्यावर्शीच मंचावर ठसक्यात लावणी जिवंत केली होती . तेव्हां तिच्या ब्लाउजमध्ये कापूस , चिंध्या , स्पंज भरून तिला उभारी दिली होती . पण हा हा म्हणता तिला असल्या कृत्रिम उपायांची गरज भासेनाशी झाली .#सुरेखामोंडकर १४/०१/२०१७
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा