कमलदलांचा पाश ( २ )
. . तिने इकडे तिकडे बघून घेतलं . वेळच आली , बोंबाबोंब केली , तर येतील ना लोक मदतीला ह्याचा अंदाज घेतला . कपाळाला आठ्या घालून , त्याच्याकडे बघत तिने स्मरणशक्तीचा रबर ताणायचा प्रयत्न केला .
" मी वर्गात होतो म्याडम तुमच्या ! "
.
. लग्नाच्या आधी ती शिक्षिका होती . मुलं होई पर्यंत नोकरी करत होती . दुसरं बाळ झाल्यावर मात्र तिला झेपेनासं झालं . दोन लहान मुलांचं संगोपन करायचं ; शाळेतली कामं उपसायची ; राजीवला कसलीही फिकीर नव्हती . त्याचं काम आणि त्याची महत्वाकांक्षा , ह्या पलीकडील त्याला काही दिसतच नव्हतं . तिची दमछाक व्हायला लागली . मुलांची ओढाताण व्हायला लागली .एकदिवस राजीनामा देऊन ती घरी आली ; घराच्या सेवेला रुजू झाली .
. . नोकरी सोडूनही आता काही वर्षं ओलांडली होती .एकदा सोडल्यानंतर शाळेशी संबंधच राहिला नव्हता . आयुष्य एवढं धावपळीच झालं होतं की कसल्या मैत्रिणी आणि कसल्या जुन्या आठवणी .झापडं लावलेल्या घोड्यासारख नुसतं पुढे धावायचं झालं! तिला काहीही आठवत नव्हतं .आताचा हा समोर असणारा राबस , प्रौढ पुरुष , किशोर वयात , विद्यार्थीदशेत कसा दिसत असेल , ह्याची कल्पनापण करता येत नव्हती . मुलं बदलत जातात . बालक - किशोर -तरुण - प्रौढ - कसं ओळखणार त्यांना ?
. तोच म्हणाला , " म्याडम , मी लहू ! आठवीत तुम्ही माझ्या वर्ग शिक्षिका होता ! "
. तरीही तिला आठवेना . मग तो एक एक संदर्भ द्यायला लागला . " आह्मी जुळे भाऊ होतो . मी आणि कुश . कुश नव्हता आपल्या वर्गात . मी नापास झाल्यामुळे मागे पडलो होतो . "
. ती नुसती "'हं ! हं ! " करत होती . मुलांची शाळा सुटायच्या आत घरी पोचायचं होतं . दाराला कुलूप बघून ती गोंधळली असती .
.
. " म्याडम ,माझी मोठी बहीण होती शांता ! आधी तुमच्या वर्गात होती .तुमची लाडकी होती . "
. शांताच नाव निघालं आणि तिला सणकन सगळं आठवलं . मोठी शांता आणि तिच्या पाठी ही जुळी . लहू आणि कुश .
. तिला लहू आठवला .साधारण बुद्धीमत्ता , सर्वसामान्य कुवत असणाऱ्या विद्यार्थ्याकडे शिक्षकांचं जेवढं लक्ष असतं , तेवढंच तिचं लहूकडे होतं . त्याच्यात खास काहीच नव्हतं . पण अंगात मस्ती पण नव्हती . शांत , समजुतदार मुलगा . पण आता हा असा काय दिसतोय ? माजोरडा ! तो रोजच त्या कोपऱ्यावर दिसायचा . एकदिवस तो पुढे आला , त्याचं बेफिकिरीने म्हणाला , " म्याडम , जेवायला येता ? मी रोज इथे हॉटेलात जेवतो . चांगलं आहे जेवण . इथे रस्त्याच्या पलीकडे आपलं वर्कशोप आहे . चला आज बरोबर जेवूया ! "
. त्याच्या धाडसाने ती थक्कच झाली . ह्याच्या बरोबर जेवायला जायचं ? घाईघाईने म्हणाली , " नाही रे ! घरी मुलं वाट पाहतील . "
" गाडी आहे आपल्याकडे . चला तुमच्या घरी जाऊन बच्चेकंपनीला पण घेऊन येऊ ! "
.पटकन तिच्या तोंडून गेलं ," गाडी तर माझी पण आहे . व्यायाम व्हावा म्हणून मी चालत येते . "
. बोलली आणि तिचं तिलाच समजेना , ' संबंध काय हे आता सांगण्याचा ? मी तुझ्यापेक्षा कमी नाही , आर्थिक कुवतीच द्योतक असणारी गाडी माझ्याकडे पण आहे , हे त्या पोराला सांगून , काय दर्शवयाच होतं तिला ? नेहमी तर ती म्हणायची , ' सर्व काही नवर्याचं आहे ,' मग वेळप्रसंगी हे ,' माझं ' कसं काय होतं ? त्या दिवशी ती त्याच्या बरोबर जेवायला गेली नाही .#सुरेखामोंडकर
२९/१२/२०१६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा