. कमलदलांचा पाश (४)
. . लग्न झाल्यावर नक्की काय झालं ? दुर्लभ गोष्ट एकदा मिळवली , आपलं यश साजरं केलं , की त्या वस्तूच मोल कमी होतं का ? हल्ली त्यांच्यात फक्त वाद होते ; संवाद नव्हताच . आधी यशस्वी होण्यासाठी तो धडपडत होता . यशाबरोबर समृद्धी आली आणि तो बदलतच गेला . पैशाने मिळणाऱ्या सर्व सुखांची त्याला चटक लागली . परदेशी उंची दारू , त्याच्या नसामधून वाहायला लागली . कधीही माहिती नसणारे , एक एक मित्र संध्याकाळी साडेपाच सहा पासूनच त्याच्या भोवती गोळा व्हायला लागले .गुळाच्या ढेपेला चिकटणार्या मुंगळयांसारखे . त्या नशा चढवणाऱ्या पाण्यासाठी , पाण्यासारखा पैसा वाहायला लागला . आरोग्याचा बळी गेला . घरातला विसंवाद वाढला . खुशमस्कर्यानी केलेल्या जयजयकाराची नशा ; जोपासल्या जाणाऱ्या आणि फुलवल्या जाणाऱ्या अहंकाराची नशा !
. कधीतरी रात्री तीन चारला तो घरी यायचा . नाना विचारांनी , अशुभाच्या कल्पनेनं , नशेत तो करीत असलेल्या ड्रायविंगच्या धसक्याने तिचा डोळ्याला डोळा लागायचा नाही . दाराचा आवाज आल्यावर अंगाची जुडी करून , डोळे घट्ट मिटून , ती , झोपेचं सोंग करायची . पण त्याला हवी तेव्हां , स्त्री देहाची मादक नशा तो तिच्या कडून वसूल करायचा .
. सिगारेटच्या धुराचा , घामाचा , बंद पब मधल्या हवेचा , अन्नपदार्थांचा संमिश्र वास त्याच्या अंगाला यायचा . तोंडाला दारूचा , तंबाखूचा उग्र वास ! तिला ते प्रेम कधी रुचलं नाही . फक्त वासना , शरीराची तीव्र मागणी -- भूक भागवायची एक कृती !हा म्हणे वैवाहिक हक्कच असतो , प्रत्येक विवाहित पुरुषाचा . ह्याला बलात्कार नाही म्हणत . प्रेम म्हणतात . पत्नीने जर नकार दिला , तर तो त्या पुरुषाप्रती कौटुंबिक हिंसाचार असतो .. मग अशा वेळेला , त्या आडदांड , नशेमुळे अधिकच आक्रमक बनलेल्या पुरुषाच्या स्वाधीन त्याचं हक्काचं शरीर करताना ; त्या स्त्रीच्या मनात , तिच्या आवडीचा पुरुष आला तर ? तो समोरचा स्पोर्ट्समन ? त्याचं चालणं , बोलणं , मोठ्याने हा --हा -- करून हसणं ; लांबूनच निरीक्षण केलेली त्याची प्रत्येक हालचाल ... !!
.
. . काय हरकत आहे ? खरंच , काय हरकत आहे !मन कुठे कुणाला दिसतंय ? मनात काय चाललंय ते कुणालाही कधीच कळणार नाही . शरीर तर त्याच्या मालकाच्या स्वाधीन आहे ना !त्या मालकाला तरी धुंदीत कळतंय का , आज आपल्या मिठीत कोण आहे ? पातिव्रत्य ..एक पतीव्र्त ; मनाने खुशाल पहावीत वेगळी स्वप्नं..... आणावीत ती प्रत्यक्षात .... मनातल्या मनात ! ह्याला व्यभिचार नाही म्हणत ! महत्व आहे ते फक्त योनी शुचितेला ; मनाच्या शुचितेला नाही --आणि असलं तरी त्याच्यावर कुठे कुणाचा पाहारा आहे ?
#सुरेखामोंडकर ३०/१२/२०१६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा