. .अधांतर ( भाग ३ )
. . एकदिवस दारात पोलीस उभे राहिले ; तिच्या पोराला -- धर्माला , काढण्या घालून ! घराची झडती घ्यायला ! सगळी गाडगी , मडकी त्यांनी उध्वस्त केली .चूल सुद्धा खणून काढली .ती रडत , भेकत होती .तिला काही कळतंच नव्हतं , काय चाललंय ते ! धर्मा ओठ गच्च आवळून गप , गुमान होता .रुक्मी पोलिसांच्या पाया पडून आक्रोश करीत होती . पोलीस धर्माला बडवीत होते . तिचा चौदा पंधरा वर्षांचा धर्मा सगळ्या वेदना सोसत होता .तोंडातून ब्र काढत नव्हता .जणू त्याची वाचाच गेली होती . रुक्मी धाय मोकलून रडत होती . शेवटी एका पोलिसाला तिची दया आली .त्याने सांगितलं , " धर्मा तुफान वेगानं , धूम स्टायलीनं फटफटी चालवतो आणि त्याच्या पाठी बसलेला पोरगा , बाया बापड्यांच्या चेनी आणि गंठण खेचतो ." धर्मा पकडला गेला होता . रुक्मी कळवळून सांगत होती ;
. " नाय हो , तो कुणी दुसरा असणार . आमच्या गरीबाकड कुठून आली फटफटी ? पोरगं चालवायला शिकणार तरी कुठं ? "
. . पण जे आईला माहित नव्हतं ते सगळं पोलिसांनी पाळमुळ खणून बाहेर काढलं . त्याच्या आज्याने मोठ्या कौतुकाने त्याचं नाव ' धर्मराज ' ठेवलं होतं . धर्मराज रिमांड होम मध्ये गेला .
. दिगूचं नशापाणी सुरूच होतं . तिचा पहाडासारखा जोडीदार हाडाचा सापळा झाला होता .... आणि ...ती काळरात्र आली . विषारी दारू पिऊन वस्ती वरची माणसं एकएक करून मरायला लागली . दुसऱ्या दिवसा पर्यंत मारणार्यांचा आकडा सत्तर , पंचाहत्तर झाला . त्यातलाच एक होता दिगू !रुक्मी कितीतरीवेळा हतबल होऊन , उद्वेगाने त्याला , " मर मेल्या ! आरं उलथत कां नाहीस ? मढ बसवलं तुझं ! " असं म्हणाली होती , पण त्या रात्री तो खरोखरच मेला . रुक्मी आजूबाजूच्या बायांबरोबर गळा काढत होती .पण तिला कळत नव्हतं की , खरोखरच तिला दुखः झालं होतं का ? की मेला ते बरं झालं ; सुटका झाली सगळ्या तापातून , क्लेशातून , हाणामारी आणि भांडणातून , असं तिला वाटत होतं ?
.
. . ते भरलं घर आता सर्वार्थाने रिकामं झालं होतं . लक्ष्मी गेली ; लाख मोलाची माणसं गेली .आता त्या विटक्या बांगड्यांचं , कळकट काळ्या पोतीचं ,कपाळा वरच्या अधेली एवढ्या पिंजरीचं ओझं पण उतरलं . लखलखत , दिमाखदार शहर ....... अनेकांची भाग्यरेषा झळाळून टाकणारं शहर ; रुक्मीला लाभलं नाही .
. . माशांचा , भाजीचा धंदा आपोआप बंद झाला होता . शहर आडवं तिडवं वाढलं होतं . उंच उंच इमारती झाल्या होत्या . आकाशही दिसत नव्हतं , तर तारे कुठून दिसणार ? वस्तीतल्या बायांना नवीन धंदा मिळाला होता , कचरा गोळा करायचा ! रुक्मी पण त्यांच्यात सामील झाली . गोण घेऊन कचऱ्याचे ढिगारे धुंडाळायचे . आता खाडीवर ती रोजचीच जायची . रिकाम्या बिअरच्या बाटल्या झाडाझुडपांतून ढीगाने मिळायच्या तिथे . कधी कधी ती अगदी किनाऱ्यावर जाऊन उभी राहायची . डोळे ताणून ताणून खाडीच्या पल्याड बघायची . जिथं तिचं माहेर होतं .
. . खाडीच्या त्या बाजूला पण खूप बदल झाले होते .तिचं गाव देखील काही खाडीला खेटून नव्हतं .. खाडी पार केल्यावर तिवरांचं जंगल ; पायवाट , खडकाळ रस्ता , माळरान , मग लांब तिकडं , टेकडीच्या अगदी पायथ्याशी -- तिच्या कुशीतच विसावलेलं तिचं गाव ! दृष्टी पोचणार नाही हे माहित असूनही ती आक्का , बाबांना शोधायची . विठूला , त्याच्या बायको , पोरांना ढूढाळायची . किती वर्षांत कोणी एकमेकांना भेटलं पण नव्हतं . वाटखर्चाला , दिल्या घेतल्याला , कडोसरीला पैसे हवेत . गरिबाला कुठली आलीत नातीगोती !
. . खरं म्हणजे दिगू गेल्यावर ती शहर सोडून गावाला जाणार होती . पण म्हणे सरकार , विषारी दारू पिऊन मेलेल्यांच्या , जित्या नातेवाईकांना एक लाख रुपये देणार होतं . एका माणसाला नोकरी देणार होतं .त्या आशेवर ती तिथे राहिली होती . नोकरी मिळाली असती तर कचऱ्याची दुर्गंधी जन्माची सुटली असती .पैसे मिळाले असते तर ते गाठीला बांधून भावाच्या भरल्या संसारात ती सुखाने राहिली असती . सरकार कडून मिळणाऱ्या पैशांची ती वाट बघत होती #सुरेखामोंडकर
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा