कमलदलांचा पाश (5)
. . प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात आणणं सोपं नसतं . काही स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी एक निर्लज्ज धाडस अंगी असावं लागतं , जे तिच्यात नव्हत . काही स्वप्नांशी , मनातल्यामनात खेळणं वेगळ आणि ती प्रत्यक्षात येणं वेगळ ; हे लवकरच तिला कळणार होतं .एकदिवस ती बाल्कनीत कपडे वाळत घालत होती . नेहमी प्रमाणे तिने समोरच्या फ्ल्याट कडे दृष्टिक्षेप टाकला . त्याचं पण बाल्कानिचं दार उघडं होतं .दारासमोरच्या भिंतीला टेकून असलेल्या बेडवर तो बसला होता . डावा पाय लांब सोडलेला , उजवा पाय गुढग्यात दुमडून शरीरापासून दूर ठेवलेला . त्या गुढग्यावर उजवा हात ठेवून , तो पंजाने तिला खुणा करत होता . बोटांच्या हालचाली करून 'ये ! ये ! ' सांगत होता .
. . ती भयचकित झाली . वाळत टाकायचा ओला कपडा हातात घेऊन ताठ झाली . डोक्यापासून पायापर्यंत पसरलेल्या जबरदस्त दहशतीनं ती गोठून गेली . तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .अभावितपणे तिची नजर त्याच्यावर खिळली होती . हो ! तिला दिसलं तो भास नव्हता . खरोखरच तो तिला एका हाताने बोलवत होता . दुसरा हात , फाकवलेल्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये हालचाल करीत होता . तिला पाहत तो मास्टरबेशन करीत होता . तिला घृणा आली , त्याची .... स्वतःची !गर्रकन वळून ती घरात गेली . बाल्कानिचं दार तिनं लावून घेतलं .
. मांजर डोळे मिटून दूध पित , पण जगाला ते कळत असतं . त्याच्यातील शिकारी नरान , मादीचा कमकुवतपणा हेरला होता . तिची अभिलाषा कधीच जोखली होती . मग त्याच्या उत्साहाची , खेळकर वृत्तीची , सौष्ठवाची जी झलक तिला मधून मधून दिसायची , ती त्याने मुद्दामहून तिला आकर्षित करण्यासाठी केलेली खेळी होती की काय ? एक शरीराने पूर्ण भरलेली प्रौढा ; अनुभवी , विवाहित ; म्हणजे पुढे काही जबाबदारी अंगावर पडणार नाही . तिने अभिसारिका बनून , त्याच्या इशाऱ्या बरोबर , लपत छपत त्याच्याकडे यावं , अशी त्याची अपेक्षा ? नव्हे ; ती येईलच ही खात्री ? कुठून येतो हा विश्वास ? युगानुयुगे , आपल्यामधील सर्वोत्कृष्ट जे असेल त्याचं प्रदर्शन मांडून , त्याचे विविध विभ्रम दाखवून मादीला आकर्षित करण्याचा , नराचा हा अहंकार की तिचाच दुर्बलपणा ?
. . खेळ तिनेच सुरु केला होता . कां बघत होती ती आसासून त्याच्याकडे ? पुरुषासारखीच स्त्रीलाही शारीरिक भूक असतेच . पण तिला ती भूक वाटेलत्या खानावळीत ; रस्त्यावरच्या ठेल्यावर भागवायची नव्हती . तिच्यावर प्रेम करत , हळुवारपणे , नजाकतीने , एक एक पाकळी फुलवत केलेला उत्सव तिला हवा होता , तो देखील तिच्या नवऱ्याकडून . इतक्या गलिच्छ इशाऱ्यावर त्याच्याकडे धावत जाण्या एवढी ती याचक नव्हती .तिला खूप अपमानास्पद वाटलं .
. पुरुष जर स्त्री कडे टक लावून बघत असेल , तर ती पण वेळ साधून त्याला अशा सूचक खुणा करत असेल कां ? ... करते की ! पण मग तिला एक नाव बहाल केलेलं असतं ! .....' वेश्या , छिनाल ..रांड ' .. अशा खुणा करणाऱ्या पुरुषाला पण , अशी काही खास नावं बहाल केलेली असतात का ? तिला तरी आठवत नव्हती .
. पुरुषाला असं कां वाटतं , की एखादी स्त्री आपल्याकडे बघतेय म्हणजे ती शरीरसंग मागतेय ! ही आपल्या पौरुषाची शान आहे ! तिची आग फक्त आपणच विझवू शकणार आहोत ! मुळात तिच्या शरीरात वणवा पेटला आहे ; हे तोच ठरवून मोकळा होतो . दुसऱ्या कोणत्याही शक्यता त्याच्या मनात येत नाहीत . होताच तो देखणा ; पुन्हा पुन्हा बघण्यासारखा . आवडायचा तिला !त्याच्याकडे नुसत्या बघण्यानेही तिला आनंदाच्या कारंज्यात भिजल्याच सुख मिळत होतं ! मानलेला भाऊ वगैरे कृत्रिम नाती तिला जोडायची नव्हती . मनातून तिला पक्कं माहित होतं की तो तिला ,' पुरुष ' म्हणूनच आवडत होता . पण ती आगीशी खेळतेय हे तिच्या लक्षात नव्हतं आलं . भावनांच्या आहारी जाऊन , त्यांच्या बरोबर वाहवत जाऊन , तिने काही गटांगळ्या खाल्या होत्या .थोडा पाय घसरला होता , थोडा तोल गेला होता . पण वास्तवात तरी , एकदा पाय घसरल्यावर कोणी चालायचं थांबतं का ? की उठून , उभे राहून , कपडे झटकून , झालेल्या जखमेला मलमपट्टी करून , पुन्हा नव्या उमेदीने चालायला सुरुवात करतं ? तेच करायला हवं ना ? अनुभवातून धडे घ्यायचे , चुका सुधारायच्या आणि मार्गक्रमणा चालू ठेवायची !
. रस्त्यावरून जाताना , शोकेसमध्ये लावलेली एखादी साडी आवडली ; रोज येता जाताना त्या साडीकडे मनभरून पाहिलं , तिच्या नजाकतीचा आनंद लुटला , म्हणजे ती साडी विकतच घ्यायची असते किंवा घ्यायलाच हवी ; आपल्या मालकीची - हक्काची करायला हवी , अंगावर लपेटायला हवी , असं थोडंच असतं . ती आपल्याला परवडणारी नाही , हे मनातून आपल्याला माहिती असतं ना ? एखाद्या सुंदर वस्तूला , व्यक्तीला पाहून -- नुसता दर्शनाचा आनंद नाहीका आपण घेऊ शकत ? त्या दिवशी तिच्या बाल्कनीचं दार बंद झालं , ते त्या नंतर , त्या घरात राही पर्यंत कधीच पुन्हा उघडलं नाही .#सुरेखामोंडकर ३१/१२/२०१६
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा