#चित्रपट_परीक्षण
#अर्धसत्य
. अख्या मुंबईवर ज्याची हुकुमत चालते . सर्व रंगाच्या दिव्यांच्या गाड्या ज्याच्या इशार्यावर चालतात किंवा थांबतात अशा ; मुंबईच्या गुन्हेगारी राज्याच्या अनभिषिक्त बादशहाच्या गुहेत ,दोन्ही हात कंबरेवर ठेवून 'तो ' उभा असतो . सब इन्स्पेक्टर अनंत वेलणकर ! संपूर्ण गणवेशात . ताठ ! रामा शेट्टीच्या डोळ्याला डोळा भिडवून , निडर , निर्भय !
. . आज पर्यंत गुन्हेगारी विश्वावर प्रकाश टाकणारे अनेक चित्रपट निघाले . खूप गाजले . नामवंत कलाकारांनी त्यात भूमिका केल्या . पण आजही , गोविंद निहालानिनी दिग्दर्शित केलेला , १९८३ मध्ये पडद्यावर आलेला ' अर्धसत्य ' गुन्हेगार आणि पोलीस यांच्या कथेवरील एकमेवाद्वितीय , चित्रपट मानला जातो . ओम पुरीच्या ' अनंत वेलणकर ने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक आणि ह्या कचकड्याच्या चित्रपट सृष्टीच्या इतिहासात , कधीही पुसलं न जाणार नाव मिळवून दिलं .एका मुलाखतीत ओम पुरींनी , अमिताभ बच्चन यांचे आभार मानले होते .ही भूमिका आधी त्यांना देण्यात आली होती , त्यांनी नाकारल्या नंतर ते दान ओम पुरींच्या झोळीत पडलं ; आणि त्यांची चित्रपट कारकीर्द नावारूपाला आली .ते अनंत वेलणकर म्हणून अजरामर झाले .
. पूर्ण सत्य .. संपूर्ण सत्य कधी कोणाला कळत का ? किंबहुना आपल्यापर्यंत पोचतं ते किती टक्के सत्य असतं .जीवनाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ , मलपृष्ठ किंवा काही पानं आपल्याला दिसतात .त्यातही कितीतरी गोष्टी असतात , ज्या आपल्यापर्यंत पोचतच नाहीत ; मग संपूर्ण पुस्तकात तर किती गोष्टी लपलेल्या असतील , ज्या आपल्याला कधीच ज्ञात होत नसतील . आपल्या पर्यंत पोचतं ते अर्धसत्यच असतं का ?
.
. . अनंत वेलणकर , एक सौम्य प्रकृतीचा , संवेदनशील तरुण . बी ए झाल्यावर पुढे शिकून त्याला प्रोफेसर बनायचं असतं. . आक्रस्ताळी , निष्ठुर , उग्र बापाच्या दहशतीमुळे तो पोलीस खात्यात प्रवेश करतो . बापाने ,(अमरीश पुरी ) आईला कायम उठता लाथ , बसता बुक्की घातलेली असते ( माधुरी पुरंदरे ) . मनात अत्यंत संताप आणि बापाबद्दल घृणा असूनही कधी त्याला बापाला रोखता आलं नव्हतं , आईचा बचाव करता आला नव्हता . पोलिसांच्या निर्दयी दुनियेत तो रमत नाही . अकल्पनीयरित्या त्याच्या आयुष्यात ज्योत्स्ना गोखले ( स्मिता पाटील ) येते . ती कॉलेजात लेक्चरर असते . तिच्याच हातात तो ' अर्धसत्य ' हा कवितासंग्रह पाहतो , त्यातील तिची आवडती ,'चक्रव्यूह ' ही कविता वाचताना तो अंतर्मुख होत जातो .
. मानवी स्वभावाचा , एक एक पापुद्रा दृश्य चित्रातून , संवादातून , अलवार उलगडत जायचं , त्यावर कोणतही भाष्य , टीका टिप्पणी न करता , प्रेक्षकाच्या विश्लेषणात्मक वृत्तीवर निष्कर्ष सोडून द्यायचा ,हे ह्या सिनेमाचं वैशिट्य आहे .
सिद्धहस्त लेखक श्री. दा . पानवलकर यांच्या गाजलेल्या ' सूर्य ' ह्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे ( सर्वोत्कृष्ट कथेच पारितोषिक ) त्याची पटकथा केली आहे , नामवंत लेखक विजय तेंडुलकर यांनी ( त्यांनाही पारितोषिक मिळालंय ) वसंत देव यांनी संवाद लेखन केलं आहे . त्यातील चक्रव्यूह ही , कविता आहे दिलीप चित्रे यांची . ह्यातील छोट्या छोट्या ,दोन तीन मिनिटांच्या भूमिकाही , रंगभूमी वरील गाजलेल्या कलाकारांनी केल्या आहेत . ह्या चित्रपटाने पारितोषिकांची लयलूट केली आणि रसिकांच्या मनावर राज्य केलं .
. मनाविरुद्ध पोलिसात भरती झालेला अनंत वेलणकर आदर्शवादी होता . अडल्या नाडलेल्याना पोलिसांकडून मदत मिळाली पाहिजे ह्यावर त्याची श्रध्दा होती एका पांढरपेशा विवाहित स्त्रीशी भर रस्त्यात , गुंडांकडून असभ्य वर्तन केलं जातं . तिच्या पतीच्या तक्रारीवरून वेलणकर गुंडांना मोठ्या शिताफीने पकडतो . कोठडीत टाकतो . पण वरून आलेल्या एका फोनने त्यांची चुटकीसरशी सुटका होते . त्याला अपमानित केलं जातं .रामा शेट्टीच्या एका माणसाला , त्याच्याच आदेशावरून जबरदस्त मारहाण करून , जाळून टाकलं जातं . त्याच्या मृत्युपूर्व जबानी प्रमाणे वेलणकर शेट्टीला अटक करायला जातो . तेव्हां पण सर्व पुरावे हातात असूनही वेलणकरला केवळ एक फोन हतबल करून टाकतो . तोच रामा शेट्टी , निवडणुकीत निवडून येतो ; त्याच्या शक्ती प्रदर्शनाच्या मोर्चाला संरक्षण देण्यासाठी वेलणकरचीच नेमणूक करण्यात येते .
. असा कर्तव्यदक्ष अधिकारी कुणालाच नको असतो . त्याचा बॉस ( शफी इनामदार ) त्याला सावध करतो . तडजोड करायचा सल्ला देतो . एकदा आपल्या ओळखीचा उपयोग करून दिल्ली हून मदत मिळवून त्याला सस्पेन्शन पासून वाचवतो . सस्पेन्शन झाल्यावर , लोबोची ( नसिरुद्दीन शहा ) काय हालत झालेली असते आणि बेवारस कुत्र्यासारखा तो रस्त्यावर कसा मरून पडतो हे वेलणकरने पाहिलेलं असतं . पण शेपूट घालून नपुंसक जिण त्याला जगायचं नसतं.
एका मुलीला खोलीत डांबून तिच्यावर रेप केल्याच्या गुन्ह्यात तो , रामा शेट्टीच्या मुलालाच जेरबंद करतो . तो देखील ताठ मानेने , छाती पुढे काढून वेलणकरच्या समोरून निघून जातो .निराशेच्या गर्तेत गेलेला वेलणकर हळूहळू दारूच्या आहारी जातो . ज्योत्स्ना त्याला समजून घेते , पण तिने त्याचं आयुष्य पाहिलेलं असतं . एका मिल मधील संप , अन्यायकारक रीतीने , बेफाट मारपीट करीत संपवताना , तिने त्याला पाहिलेलं असतं . ती त्याला नोकरी बदलायला सांगते . " एक पुलीसवाला मेरा पती नहीं हो सकता ! " , हे अत्यंत संयमाने , वस्तुनिष्ठपणे समजावून देते . पण तेव्हां त्याला अवार्ड मिळण्याची शक्यता असते , वरची श्रेणी मिळण्याची खात्री असते .
. . त्याचं श्रेय हिरावून घेतलं जातं . ते अवार्ड त्याच्या नाकावर टिच्चून दुसर्याला दिलं जातं . बढती पण त्याच्यापासून दूर जाते . त्या दिवशी तो चिक्कार पितो . त्याचा स्वतः वरचा ताबा जातो . एका मामुली भुरट्या चोराला तो थर्ड डिग्री वापरतो " दुसरोंका हक चुराता है ... कीडे , कुत्ते " आपला सगळा अपमान , निराशा , व्यथा , हतबलता तो त्या बिचार्यावर काढतो .आरोपी मरतो . नोकरी वाचवण्यासाठी त्याच्यावर रामा शेट्टीचे पाय धरायची नामुष्की ओढवते . रामा शेट्टी दिलदारपणे त्याचे सर्व ' गुन्हे ' माफ करायला , विसरायला तयार होतो . अट एकच असते , वेलणकर
ने ह्यापुढे कायम त्याच्या आज्ञेत राहायचं . त्याची हांजी हांजी करायची .
. एकदा चक्रव्यूहात शिरल्यावर बाहेर पडायला दुसरा कोणीही मदत करू शकत नाही . ज्याचा त्यालाच , आंतरिक बळावर सुटकेचा मार्ग शोधून काढायचा असतो . नपुंसक पोलीस ऑफिसर पेक्षा , मर्दपणे जगण्याचं वेलणकर ठरवतो .
,. . एक पलडे में नपुंसकता
. एक पलडे में पौरुष
.और ठीक तराजू के कांटे पर
. अर्धसत्य !

. .ओबडधोबड , देवीच्या व्रणांनी भरलेला चेहरा , ढोबळ नाक .
खोल गेलेले डोळे आणि किडकिडीत शरीरयष्टी .सिनेमात मुख्य भूमिका
करण्यासारखं काहीही गाठीला नसताना . प्रचंड आत्मविश्वास , अभिनयातील
कौशल्य आणि आवाजावरची हुकुमत ह्यांच्या सहायाने ही गुंतागुंतीची ,
मनोविश्लेषणात्मक भूमिका ओम पुरीने पडद्यावर जिवंत केली . आज
टेक्नोलॉजीतील प्रगतीने ; गुन्हेगारी , राजकारण , पोलीस , कर्तव्य ,
न्याय . सर्व समानता ह्या सर्व विषयात आपल्याला ज्ञानी करून
टाकलंय . ८३ साली मी जितकी अज्ञ होते तेवढी आज नक्कीच नाही .
तरीही आज पुन्हा पाहताना हा चित्रपट मला विषण्ण करतो . इतके
वर्षात आपण कुठे मार्गक्रमणा केली ह्या कोड्यात मला टाकतो .#सुरेखामोंडकर ९/१/२०१६
#अर्धसत्य
. अख्या मुंबईवर ज्याची हुकुमत चालते . सर्व रंगाच्या दिव्यांच्या गाड्या ज्याच्या इशार्यावर चालतात किंवा थांबतात अशा ; मुंबईच्या गुन्हेगारी राज्याच्या अनभिषिक्त बादशहाच्या गुहेत ,दोन्ही हात कंबरेवर ठेवून 'तो ' उभा असतो . सब इन्स्पेक्टर अनंत वेलणकर ! संपूर्ण गणवेशात . ताठ ! रामा शेट्टीच्या डोळ्याला डोळा भिडवून , निडर , निर्भय !
. . आज पर्यंत गुन्हेगारी विश्वावर प्रकाश टाकणारे अनेक चित्रपट निघाले . खूप गाजले . नामवंत कलाकारांनी त्यात भूमिका केल्या . पण आजही , गोविंद निहालानिनी दिग्दर्शित केलेला , १९८३ मध्ये पडद्यावर आलेला ' अर्धसत्य ' गुन्हेगार आणि पोलीस यांच्या कथेवरील एकमेवाद्वितीय , चित्रपट मानला जातो . ओम पुरीच्या ' अनंत वेलणकर ने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक आणि ह्या कचकड्याच्या चित्रपट सृष्टीच्या इतिहासात , कधीही पुसलं न जाणार नाव मिळवून दिलं .एका मुलाखतीत ओम पुरींनी , अमिताभ बच्चन यांचे आभार मानले होते .ही भूमिका आधी त्यांना देण्यात आली होती , त्यांनी नाकारल्या नंतर ते दान ओम पुरींच्या झोळीत पडलं ; आणि त्यांची चित्रपट कारकीर्द नावारूपाला आली .ते अनंत वेलणकर म्हणून अजरामर झाले .
. पूर्ण सत्य .. संपूर्ण सत्य कधी कोणाला कळत का ? किंबहुना आपल्यापर्यंत पोचतं ते किती टक्के सत्य असतं .जीवनाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ , मलपृष्ठ किंवा काही पानं आपल्याला दिसतात .त्यातही कितीतरी गोष्टी असतात , ज्या आपल्यापर्यंत पोचतच नाहीत ; मग संपूर्ण पुस्तकात तर किती गोष्टी लपलेल्या असतील , ज्या आपल्याला कधीच ज्ञात होत नसतील . आपल्या पर्यंत पोचतं ते अर्धसत्यच असतं का ?
.
. . अनंत वेलणकर , एक सौम्य प्रकृतीचा , संवेदनशील तरुण . बी ए झाल्यावर पुढे शिकून त्याला प्रोफेसर बनायचं असतं. . आक्रस्ताळी , निष्ठुर , उग्र बापाच्या दहशतीमुळे तो पोलीस खात्यात प्रवेश करतो . बापाने ,(अमरीश पुरी ) आईला कायम उठता लाथ , बसता बुक्की घातलेली असते ( माधुरी पुरंदरे ) . मनात अत्यंत संताप आणि बापाबद्दल घृणा असूनही कधी त्याला बापाला रोखता आलं नव्हतं , आईचा बचाव करता आला नव्हता . पोलिसांच्या निर्दयी दुनियेत तो रमत नाही . अकल्पनीयरित्या त्याच्या आयुष्यात ज्योत्स्ना गोखले ( स्मिता पाटील ) येते . ती कॉलेजात लेक्चरर असते . तिच्याच हातात तो ' अर्धसत्य ' हा कवितासंग्रह पाहतो , त्यातील तिची आवडती ,'चक्रव्यूह ' ही कविता वाचताना तो अंतर्मुख होत जातो .
. मानवी स्वभावाचा , एक एक पापुद्रा दृश्य चित्रातून , संवादातून , अलवार उलगडत जायचं , त्यावर कोणतही भाष्य , टीका टिप्पणी न करता , प्रेक्षकाच्या विश्लेषणात्मक वृत्तीवर निष्कर्ष सोडून द्यायचा ,हे ह्या सिनेमाचं वैशिट्य आहे .
सिद्धहस्त लेखक श्री. दा . पानवलकर यांच्या गाजलेल्या ' सूर्य ' ह्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे ( सर्वोत्कृष्ट कथेच पारितोषिक ) त्याची पटकथा केली आहे , नामवंत लेखक विजय तेंडुलकर यांनी ( त्यांनाही पारितोषिक मिळालंय ) वसंत देव यांनी संवाद लेखन केलं आहे . त्यातील चक्रव्यूह ही , कविता आहे दिलीप चित्रे यांची . ह्यातील छोट्या छोट्या ,दोन तीन मिनिटांच्या भूमिकाही , रंगभूमी वरील गाजलेल्या कलाकारांनी केल्या आहेत . ह्या चित्रपटाने पारितोषिकांची लयलूट केली आणि रसिकांच्या मनावर राज्य केलं .
. मनाविरुद्ध पोलिसात भरती झालेला अनंत वेलणकर आदर्शवादी होता . अडल्या नाडलेल्याना पोलिसांकडून मदत मिळाली पाहिजे ह्यावर त्याची श्रध्दा होती एका पांढरपेशा विवाहित स्त्रीशी भर रस्त्यात , गुंडांकडून असभ्य वर्तन केलं जातं . तिच्या पतीच्या तक्रारीवरून वेलणकर गुंडांना मोठ्या शिताफीने पकडतो . कोठडीत टाकतो . पण वरून आलेल्या एका फोनने त्यांची चुटकीसरशी सुटका होते . त्याला अपमानित केलं जातं .रामा शेट्टीच्या एका माणसाला , त्याच्याच आदेशावरून जबरदस्त मारहाण करून , जाळून टाकलं जातं . त्याच्या मृत्युपूर्व जबानी प्रमाणे वेलणकर शेट्टीला अटक करायला जातो . तेव्हां पण सर्व पुरावे हातात असूनही वेलणकरला केवळ एक फोन हतबल करून टाकतो . तोच रामा शेट्टी , निवडणुकीत निवडून येतो ; त्याच्या शक्ती प्रदर्शनाच्या मोर्चाला संरक्षण देण्यासाठी वेलणकरचीच नेमणूक करण्यात येते .
. असा कर्तव्यदक्ष अधिकारी कुणालाच नको असतो . त्याचा बॉस ( शफी इनामदार ) त्याला सावध करतो . तडजोड करायचा सल्ला देतो . एकदा आपल्या ओळखीचा उपयोग करून दिल्ली हून मदत मिळवून त्याला सस्पेन्शन पासून वाचवतो . सस्पेन्शन झाल्यावर , लोबोची ( नसिरुद्दीन शहा ) काय हालत झालेली असते आणि बेवारस कुत्र्यासारखा तो रस्त्यावर कसा मरून पडतो हे वेलणकरने पाहिलेलं असतं . पण शेपूट घालून नपुंसक जिण त्याला जगायचं नसतं.
एका मुलीला खोलीत डांबून तिच्यावर रेप केल्याच्या गुन्ह्यात तो , रामा शेट्टीच्या मुलालाच जेरबंद करतो . तो देखील ताठ मानेने , छाती पुढे काढून वेलणकरच्या समोरून निघून जातो .निराशेच्या गर्तेत गेलेला वेलणकर हळूहळू दारूच्या आहारी जातो . ज्योत्स्ना त्याला समजून घेते , पण तिने त्याचं आयुष्य पाहिलेलं असतं . एका मिल मधील संप , अन्यायकारक रीतीने , बेफाट मारपीट करीत संपवताना , तिने त्याला पाहिलेलं असतं . ती त्याला नोकरी बदलायला सांगते . " एक पुलीसवाला मेरा पती नहीं हो सकता ! " , हे अत्यंत संयमाने , वस्तुनिष्ठपणे समजावून देते . पण तेव्हां त्याला अवार्ड मिळण्याची शक्यता असते , वरची श्रेणी मिळण्याची खात्री असते .
. . त्याचं श्रेय हिरावून घेतलं जातं . ते अवार्ड त्याच्या नाकावर टिच्चून दुसर्याला दिलं जातं . बढती पण त्याच्यापासून दूर जाते . त्या दिवशी तो चिक्कार पितो . त्याचा स्वतः वरचा ताबा जातो . एका मामुली भुरट्या चोराला तो थर्ड डिग्री वापरतो " दुसरोंका हक चुराता है ... कीडे , कुत्ते " आपला सगळा अपमान , निराशा , व्यथा , हतबलता तो त्या बिचार्यावर काढतो .आरोपी मरतो . नोकरी वाचवण्यासाठी त्याच्यावर रामा शेट्टीचे पाय धरायची नामुष्की ओढवते . रामा शेट्टी दिलदारपणे त्याचे सर्व ' गुन्हे ' माफ करायला , विसरायला तयार होतो . अट एकच असते , वेलणकर
ने ह्यापुढे कायम त्याच्या आज्ञेत राहायचं . त्याची हांजी हांजी करायची .
. एकदा चक्रव्यूहात शिरल्यावर बाहेर पडायला दुसरा कोणीही मदत करू शकत नाही . ज्याचा त्यालाच , आंतरिक बळावर सुटकेचा मार्ग शोधून काढायचा असतो . नपुंसक पोलीस ऑफिसर पेक्षा , मर्दपणे जगण्याचं वेलणकर ठरवतो .
,. . एक पलडे में नपुंसकता
. एक पलडे में पौरुष
.और ठीक तराजू के कांटे पर
. अर्धसत्य !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा