कमलदलांचा पाश (६)
. . जेवणाचं आमंत्रण नाकारल्यानंतर लहू दिसायचा बंद झाला होता . एक दिवस अचानक तो घरी आला . त्याच्या सारख्या माणसाने घरी येणं , तिला अजिबात आवडलं नव्हतं . ' काय म्हणाले असतील बिल्डींगमधील माणस त्याला बघून ! ' ती अवघडली होती . मनाविरुद्ध तिनं त्याचं आगतस्वागत केलं . चेहऱ्यावर नाराजी न दाखवता ! लग्नपत्रिका घेऊन आला होता तो !
. . " म्याडम , यायचं हं नक्की ! बघा कसा थाट उडवून देतो ते ! शांताच्या , कुशच्या लाग्नापेक्षाही दणक्यात होणार आहे . बघाच तुम्ही , साल्यांचे डोळे फाटणार आहेत . सगळ्यांनी यायचं हं ! "
. संभाषण वाढू नये ; त्याने लवकर घरातून जावं , म्हणून ती नुसती ' हं ! हं ! ' करीत होती . तो मात्र भल्यामोठ्या बाता मारत आरामशीर बसला होता . जायचा तेव्हांच गेला !
. अशी आमंत्रणं बहुतेक मानाची असतात ; बातमी देणं एवढाच उद्देश असतो . देणाऱ्याच्या पण फारशा अपेक्षा नसतात . लग्नाच्या दिवशी सक्काळी सक्काळी लहूचा फोन आला . " म्याडम , लक्षात आहे ना ? यायचं हं लग्नाला ! " ती चपापली . लग्नाला न जायचं तिने कधीच नक्की केलं होतं . तिला कळेचना , स्वतःच्या लग्नाच्या दिवशी , सर्व विधी चालू असताना , तिच्या सारख्या अल्प परिचिताला फोन करण्या एवढा वेळ , नवरदेवाला मिळतो कसा ? एवढा बहुमान ? तिच्या उपस्थितीच एवढं महत्व त्याच्या दृष्टीने का होतं ? तिने स्पष्टपणे सांगून टाकलं ,
. " मला यायला नाही जमणार लहू ! तुझं वैवाहिक आयुष्य सुखाचं जाओ! खूप खूप आशीर्वाद ! "
......... . तो एकदम गडबडला. त्याच्या आवाजातली गुर्मी कमी झाली . " म्याडम प्लीज या ना ! बर रिसेप्शनला या ! "
. पुन्हा पुन्हा विनवणी करू लागला . शेवटी तिने ठाम पणे , कठोर स्वरात सांगितलं , " लहू विधिंकडे लक्ष दे ! ते सर्व महत्वाचं असतं . मला यायला जमणार नाही . माझी वाट पाहू नकोस ! " तिने फोन ठेवून दिला .
.रात्री आठच्या सुमारास पुन्हा त्याचा फोन आला . " म्याडम , येताहात ना ? "
' लहू , तुला सांगितलं ना ? नाहीरे मला जमण्यासारखं . "
" प्लीज ..... प्लीज , या ना म्याडम ! "
" सॉरी लहू , मुलं लहान आहेत . त्यांना घेऊन नाही येता येणार . , त्यांच्या उद्या सकाळी शाळा आहेत . पहाटे उठावं लागतं त्यांना . ठेवूनही नाही येता येणार . त्यांची काळजी घ्यायला घरी कोणी नाही . "
. पण पंधरा पंधरा ; वीस वीस मिनिटांनी त्याचे फोन येतच राहिले . ती गोंधळून गेली होती . तो एवढा आग्रह का करत होता तिला ? रात्र वाढत चालली होती . त्याच्या आग्रहाचं तिच्यावर दडपण येत होतं .पण आता विचार बदलला असता तरी जाता येणं शक्य नव्हतं . तिला कळत नव्हतं , शांताच्या , कुशच्या लग्नाचं तिला आमंत्रण नव्हतं . शाळेतला विद्यार्थी ! तेव्हां पण कौटुंबिक मैत्री होती , असं नाही . मध्ये खूप काळ निघून गेला होता . कसलाही संपर्क नव्हता .. तो भेटला योगायोगाने .ती भेट सुद्धा नंतर मैत्रीत रुपांतरीत झाली नव्हती . होण्याची शक्यताही नव्हती . बौद्धिक , सामाजिक , आर्थिक , वयाचा -- केवढा मोठा फरक होता दोघांमध्ये ; आणि हा आज अस काय करतोय ? ' नाही ' म्हणायला अवघड वाटेल , एवढा आग्रह का करतोय ? " #सुरेखामोंडकर ०१/०१/२०१६
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा