#भास_आभास_भाग३
.
.
. . आम्ही उठलो . आई पण येणार म्हणाली . मला देखील श्री अमेरिकेला जाण्याच्या आत सर्व समज - गैरसमज दूर करायचे होते . कोणत्याही शंका , संशय उरायला नको होते . अवेळ होती , पण इलाज नव्हता . श्रीने जितूला फोन करून बोलावलं .
.
." तो कशाला आणखीन ? जगजाहीर करायचंय का ? "
.
. ' असू दे बरोबर . जुनिअर केजी पासून आम्ही बरोबर आहोत . किती वर्षांची दोस्ती आहे आमची . एकमेकांपासून आम्ही काही लपवत नाही .बघू त्याला ती आठवतेय का ! उपयोगच होईल आपल्याला त्याचा ."
.
. . पत्ता माहीत नव्हता . आडनाव माहीत नव्हतं . ' सलोनी 'ह्याखेरीज काहीच माहीत नव्हत . पण एकदा त्यांनी बोलता बोलता घराजवळच्या मारुतीच्या देवळाचा उल्लेख केला होता . गावातला एक अत्यंत लोकप्रिय चाटवाला त्यांच्या बिल्डींगच्या तळमजल्यावर आहे , हे पण त्या बोलल्या होत्या .तेवढ्या खुणांवर पत्ता शोधायचं ठरवलं . सुदैवाने पत्ता बरोबर मिळाला . चाटवाल्याने तर फ्ल्याट नंबरही सांगितला .पण सलोनीची आई म्हणाल्या प्रमाणे , रस्त्यावर गर्दी खूप होती . तऱ्हेतर्हेची वाहनं उभी होती . पार्किंगला जागा मिळेना . शेवटी श्री म्हणाला , " तुम्ही सगळे वरती जा . आजी किती वेळ उभी राहणार ! मी बाजूच्या एखाद्या गल्लीत गाडी लावून येतो ."
.
. . मी फ्ल्याटची बेल दाबली . सलोनीच्या आईनेच दार उघडलं . आम्हांला सर्वाना पाहून प्रथम चकितच झाल्या . मग खूप खुश झाल्या . आम्हांला बसायला सांगितलं . फ्यान सुरु केला . जितुकडे बघून म्हणाल्या , ' श्री , मला खात्री होती , तू नक्की येशील ! "
.
.त्यांची एकाच गडबड उडाली होती . तिथूनच हाक मारून त्या म्हणाल्या , " सलोनी , अगं बघ कोण आलंय ! श्री आलाय श्री ! मी तुला म्हटलं नव्हतं ? असा कसा विसरेल तो तुला ? "
.
. ,. आम्ही सर्वांनी एकमेकांकडे सूचकपणे पाहिलं . ' हा श्री नाहीये ' हे माझ्या जिभेवर आलेलं वाक्य मी गिळलं . सलोनी बाहेर आली . समोर बसली . रात्रीच्या पोशाखात , झोपेच्या अवतारात पण ती खूप छान दिसत होती . तिचे बाबा बाहेर येऊन बसले . जितूलाच श्री समजून सलोनीची आई खूप बोलत होती . अत्यानंदाने तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं. सलोनी गप्पच बसली होती . तशीच पापण्या लववून , शांतपणे . तिचे बाबा अस्वस्थपणे चुळबुळ करीत होते . पण काहीच बोलत नव्हते . बायकोला गप्प करीत नव्हते , संभाषणाला दिशा देत नव्हते .
.
. . इतक्यात पुन्हा बेल वाजली . श्री आला . पार्किंग साठी बरंच लांब जावं लागलं असणार . आता ह्यांनी तोंड उघडलं , " हा आमचा मुलगा , श्री ! "
.
. . हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरली . सलोनीच्या आईचा चेहरा उतरला . पण लगेच त्यांनी सुरु केलं , " तरी मला वाटलंच , श्री इतका वेगळा कसा दिसतोय . एवढा कसा बदलला , मी म्हणतच होते ............"
.
. . त्यांचं वाक्य तोडत ह्यांनी खालच्या पण धारदार स्वरात विचारलं , " सलोनी , तू श्री ला ओळखतेस ? "
.
. . . तिने मान वर केली . समोर पाहिलं . काहीच बोलली नाही . ' हो ' पण नाही आणि ' नाही ' पण नाही . तिची दृष्टी भिरभिरत होती . ती कोणाकडेच पहात नव्हती . .त्या डोळ्यांत ओळखच नव्हती . ज्याला मी तिचा शांतपणा मानत होते , तो निर्विकारपणा तर नव्हता ना !
.
.ह्यांनी पुन्हा विचारलं , ' श्रीने तुला लग्नाचं वचन कधी दिलं होतं ? "
.
. ती तशीच गप्प बसली होती . चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते . नाक , डोळे सुंदर असलेला एक चेहरा , बस ! भावना विरहित !
.
. . ह्यांनी खूप समंजसपणे तिच्या बाबांना सर्व समजावून सांगितलं .तिच्या आईला समजावलं .होते ते दोघे एका कॉलेजमध्ये दोन वर्ष . पण त्या शैक्षणिक संस्थेच्या आर्टस सायन्स , कॉमर्स , म्यानेजमेंट , डिप्लोमा इंजिनिअरिंग अशा बऱ्याच शाखा होत्या . प्रत्येक इमारत स्वतंत्र होती . मुद्दाम प्रयत्न केल्या शिवाय कुणाला भेटणं सहज शक्य नव्हतं . श्री तर तिला ओळखतही नव्हता . जितूलाही ती माहीत नव्हती . मग सलोनीचा , तिच्या आईचा , असा गैरसमज का झाला होता कळत नव्हतं . तिचे बाबा तर काहीच बोलत नव्हते . एकाएकी ते उभे राहिले . हात जोडून म्हणाले , " माफ करा . तुम्हां सर्वाना खूप त्रास झाला . विसरून जाऊया सगळं! "
.
. . विसरणं इतकं सोपं नव्हतं . त्यांना तर नव्हतंच , पण आम्हांलाही नव्हतं . पण एक बरं झालं . श्री जायच्या आत सगळा सोक्षमोक्ष लागला होता . डोक्यावरचं ओझं उतरलं होतं . माझं मन स्वच्छ झालं होतं .
#सुरेखामोंडकर .. ०५/०३/२०१७ .... *क्रमशः
. "

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा