#भास_आभास_भाग५_अंतिम
.
. . श्रीची दुसरी सेमिस्टर संपली . आम्ही त्याच्याकडे जाऊन आलो . त्याचं कॉलेज , मित्र मंडळ , एकंदर सर्वच वातावरण मस्तच होतं . छान रमला होता तो .त्यामुळे मी पण खुश होते . सलोनीचा विषय मी काढला नाही . त्याच्या दृष्टीने तर त्यावर कधीच पडदा पडला होता . आम्हांला परत येऊन दोन दिवस पण झाले नाहीत आणि दोघी दारात हजर झाल्या . नेहमी जोडीनेच फिरतात की काय कोण जाणे ! एकदम घरातच घुसल्या .
.
. घायकुतीला आल्यासारखं सलोनीच्या आईने विचारलं , " श्री आलाय ? "
.
. " नाही हो ! "
.
." कुठे लपवून ठेवलात त्याला ? "
.
." अहो , लपवून कशाला ठेवेन ? "
.
. त्या शोधक नजरेने इकडे तिकडे बघत होत्या . " दाराला कुलूप लावून मला टाळायला बघत होता का ? "
.
. " नव्हतो आम्ही काही दिवस , म्हणून कुलूप होतं . "
.
. " श्री नक्की आलाय . तुम्हांला सांगायचं नसेल तर नका सांगू . मला पक्की माहिती आहे . त्या शिवाय का तो सलोनीला भेटायला बोलावतो ? "
.
.आता मात्र मी चरकले . ह्या सुंदर मुलीला कोणीतरी फसवतंय का ? श्रीच्या नावाचा उपयोग करून तिला गोत्यात तर नाही आणणार ? मी सावध झाले . " श्री तिला भेटायला बोलावतो ? "
.
. " हो ना ! "
.
." कसा बोलावतो ? फोन करतो ? कसा बोलावतो कसा ? "
.
." अहो एक का आहे ? प्रेमात पागल झालेल्याला हजार मार्ग सापडतात . कधी एस एम एस करतो . कधी ईमेल करतो . कधी पत्रपेटीत चिट्ठी टाकून जातो . कधी खुणेचा विशिष्ट प्रकारे , गाडीचा हॉर्न वाजवत रस्त्यावरून जातो ."
.
." कुठे बोलावतो ? "
.
. " कधी गावाबाहेरच्या तलावाच्या काठी , कधी टेकडीवर , कधी शंकराच्या देवळापाशी .ही आपली वेड्यासारखी प्रत्येक ठिकाणी तो सांगेल त्या वेळेला भेटायला जाते . "
.
. . भीतीने माझ्या अंगावर शहारा आला . नक्कीच कोणीतरी ह्या भाबड्या पोरीला फसवतंय . तिचा गैरफायदा घेतंय . " अहो तुम्हांला माहीत आहे तर तुम्ही का नाही जात तिच्या बरोबर ? तिला एकटीला का पाठवता अशा आडजागी ? "मी कळवळून विचारलं .
.
. " गेले होते ना , एकदा मी गेले होते तिच्याबरोबर . पण बहुतेक मी सोबत आहे हे त्याला कळलं होतं . त्या दिवशी तो आलाच नाही . तिथल्या कट्यावर चार टारगट पोरं बसली होती . आमच्याकडे बघून फिदी फिदी हसत होती . सगळ्यांनी सारखाच टी शर्ट घातला होता . काळ्या रंगाचा . श्रीचा आहे ना , तसाच . "
.
. . मला खूप हळहळ वाटली . इतका वेळ त्या उभ्याच होत्या . मी त्यांना कोचावर बसवलं . कळसूत्री बाहुलीप्रमाणे सलोनीपण बसली . त्यांचा हात हातात घेतला ." सलोनीच्या आई , माझ्यावर विश्वास ठेवा . खरोखरीच श्री भारतात आलेला नाही . तो त्याच्या अभ्यासात गर्क आहे . त्याला ईमेल्स करायला पण वेळ नाहीये .कोणीतरी सलोनीला फसवत तर नाहीये ना ? "
.
. त्यांनी डोळे विस्फारून माझ्याकडे पाहिलं . त्यांच्या मनात बहुधा ही कल्पनाच आली नव्हती . पण इतके दिवस गप्प असलेली सलोनी आज जोरात ओरडली , " नाही , कोणी फसवत नाहीये मला . श्रीच बोलावतो मला भेटायला . ईमेल्स करतो . त्याचं प्रेम आहे माझ्यावर . तुम्ही रागवाल म्हणून तो तुम्हांला सांगत नाहीये . पण तो लग्न करणार आहे माझ्याशी .मला पळवून अमेरिकेला घेऊन जाणार आहे . तुमच्या हाती मग आम्ही कधीच लागणार नाही .आमच्या जगात तुम्हांला प्रवेश नाही . '
.
.इतक्या दिवसांत सलोनीचा आवाज मी प्रथमच ऐकला होता . शब्दांतील जळजळीत भाव तिच्या स्वरात नव्हते . चेहऱ्यावर नव्हते . वाक्यांना न शोभणारा अगदी एकसुरी , सपाट आवाज होता तिचा . भावरहित चेहरा होता .
.
.नकळतपणे मी त्या निष्पाप पोरीला जवळ घेतलं . पाठीवर थोपटत राहिले . माझी जबाबदारी माझ्या लक्षात आली होती .थोडावेळ तिला शांत व्हायला देऊन म्हणाले , " अगं , माझा मुलगा मला खूप प्रिय आहे . मग त्याला आवडणारी प्रत्येक व्यक्ती मला प्रिय असणारच ना ! तुझ्याशी लग्न केलं तर मला राग का येईल ? त्याचा गैरसमज झाला आहे .आता पुढच्या वेळेला जेव्हां तो तुला बोलावेल तेव्हां मला बरोबर नेशील ? मी त्याला समजावते . "
.
.सलोनीची आई घाईघाईने म्हणाली , " अहो आजच बोलावलंय त्याने टेकडीवर . आम्ही तिकडेच चाललोय . "
.
. मी पटकन पायात चपला सरकवल्या .. ही संधी मला सोडायची नव्हती . जो कोणी तो गुंड आहे त्याला आज चांगली अद्दल घडवते . असा धडा शिकवते की पुन्हा म्हणून सलोनीच्याच काय , कोणत्याही मुलीच्या वाटेला जाणार नाही .
.
. . आम्ही तिघी टेकडीवर आलो .खूप वेळ वाट पाहिली . हळूहळू अंधार पडायला लागला . तरीही तो आला नाही . " मला माहीत होतं तो येणार नाही . त्याला बरोबर समजलं असणार आज तुम्ही आला आहात ते ! सलोनीला एकटीला गाठायला बघतो तो ." सलोनीची आई म्हणाली .
.
. आणखीन थोडावेळ वाट बघून निघावं , असा मी विचार करत होते . कुठे कोणी संशयास्पद व्यक्ती दिसतेय का , हे शोधक नजरेने चौफेर बघत होते . इतक्यात सलोनीची आई हलक्या आवाजात कुजबुजली , " ते बघा , ते चौघे टवाळखोर ! "
.
." कुठे ? "
.
." ते काय तिथे कट्ट्यावर बसलेत . आज पण चौघांनी सारखे शर्ट घातले आहेत . निळ्या चौकडीचे . श्रीसारखेच ! '
.
.त्या दाखवत होत्या त्या दिशेला मी न्याहाळून बघत होते . मला कोणीच दिसत नव्हतं . कट्टा दिसत होता , पण त्यावर कोणीच बसलं नव्हतं ..कट्टा पूर्ण रिकामा होता . रस्त्यावर दिवे लागले होते . त्यांच्या मंद पिवळ्या प्रकाशात झाडांच्या सावल्या कट्ट्यावर पडल्या होत्या . वाऱ्याच्या झोताबरोबर चित्रविचित्र रूपं घेत होत्या .
.
." नालायक , हलकट . ' सलोनीच्या आईचा आवाज चढायला लागला होता . " ह्यांनीच , ह्यांनीच श्रीला अडवलं असणार .त्याला ते सलोनीबद्दल खोटंनाट सांगतात . श्री मूर्ख नाहीये . तो फसणार नाही . तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही . मवाली , गुंड . माझ्या मुलीची टिंगल करता ? बघा , बघा कसे फिदी फिदी हसताहेत . अरे , बघून घेईन एकेकाला . पोलिसांत देईन . ' त्यांनी बोलता बोलता सलोनीचा हात पकडला . तिला खेचत टेकडी उतरायला सुरुवात केली . चालता चालता त्यांच्या तोंडाचा पट्टा अविरत चालू होता . मी त्यांच्या बरोबर आले आहे , हे त्या पूर्णपणे विसरून गेल्या होत्या . माझ्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही . हळूहळू दोघी दिसेनाशा झाल्या .
.
. मी तिथे एकटीच उभी होते आणि होता तो रिकामा कट्टा ! मी पाहिलेला 'देवराई ' सिनेमा मला आठवला . वाचलेलं ' देवराईच्या सावलीत ' हे पुस्तक आठवलं .हा सर्व प्रकार मला परिचित वाटू लागला . ह्या दोघींपैकी कुणातरी एकीला पराकोटीचे भास होत होते . अतीव प्रेम आणि सतत असणारी जवळीक , ह्यामुळे दुसरीला ते सगळं खरंच वाटत होतं . देह दोन , दोन मनं , पण स्वप्नं मात्र एकचं बघत होत्या . दोघी मिळून एकच चित्र रंगवत होत्या . अगदी मनापासून . त्या भ्रामक चित्रालाच सत्य मानत होत्या . त्यातच पूर्ण गुराफटल्या होत्या . मला ते आता कळत होतं . त्यावर उपाय आहे हे देखील माहीत होतं . पण आत्ता ह्या क्षणाला तरी कळवळून अश्रू ढाळण्याखेरीज माझ्या हातात काहीच नव्हतं #सुरेखामोंडकर -- ०६ /०३ /२०१७
*समाप्त .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा