#बाप्पाचा_गणपती_(भाग १ )
.
.
. ..... . सकाळी लवकर येऊन बाप्पाने टेम्पो कंपनीच्या स्टोअर रुमच्या समोर लावला . आज सामानाची डिलिव्हरी होती .आज चतुर्थी होती . बाप्पाचा कडकडीत उपास असतो . पण त्याच्या उपासाचा त्याच्या कामावर कधीच परिणाम होत नाही . व्यवस्थीत प्याक केलेली खोकी त्याने क्रमवार लावून घेतली . सगळ्यात शेवटी असणारी , लांबच्या डिलिव्हरीची खोकी आधी रचून , त्याच्यापुढे एकेक खोकं रचत , त्याने चटाचट काम उरकलं . सर्व व्यवस्थीत आहेना , ह्याची त्याने एका नजरेत खात्री करून घेतली . योग्य ती कागदपत्रं घेतली . एखादा कलाकार जसा रंगभूमीला वंदन करून त्यावर पाय ठेवतो , त्या प्रमाणे गाडीत चढण्याच्या आधी त्याने गाडीला नमस्कार करून , उजवा पाय प्रथम आत टाकला .डयाश बोर्डवर चिकटवलेल्या गणपतीच्या छोट्या संगमरवरी मूर्तीला , कंपनीच्याच आवारातून आणलेलं लाल जास्वंदीचं फूल वाहिलं . हात जोडून पुटपुटला
.
. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा
.
.स्टीअरिंग व्हील ला नमस्कार करून त्याने गाडी सुरु केली .

. . आवारा बाहेर गाडी येऊन रस्त्याला लागल्यावर त्याने रेडीओ सुरु केला . .कुठचं तरी स्टेशन सुरु झालं .
मै रंग शरबतोंका
तू मीठे घाटका पानी
त्याच्या आवडीचं गाणं . तो तल्लीन होऊन ऐकत होता . डोळे रस्त्यावर खिळले होते . अतिशय सतर्क राहून तो गाडी चालवायचा .गाणं संपलं . दुसरं गाणं सुरु झालं . " चार बोटल वोडका " , त्याने वैतागून स्टेशन बदललं . अशीच कोणती कोणती , ट्रकर्सची , ठेक्याची , उडत्या चालीची , ज्याने झोप उडेल , डुलकी लागणार नाही अशी छचोर गाणी सुरु होती . रस्त्यावर डोळे ठामपणे भिडवून , एका हाताने व्हील सांभाळत , दुसऱ्या हाताने तो स्टेशन बदलत होता .आणि सटकन त्याच्या कानांनी एक गाणं पकडलं , ' गजानना तू गणराया ; आधी वंदू तुज मोरया !! '
.
. . तो खुश झाला . त्याचा गाण्यांचा शोध थांबला . तो तल्लीनतेने गाणं ऐकू लागला . फक्त बाप्पाच नाही , तर त्याचं संपूर्ण कुटुंब गणपती बाप्पाचे भक्त होते . त्याचं नाव सुद्धा गणपतीचाच प्रसाद म्हणून गणेश ठेवलं होतं . लहानपणी खेळताना सर्व पोरं त्याला गण्या म्हणायचे . खरं म्हणजे त्यात विशेष काहीच नव्हतं . नावांचे अपभ्रंश करणं पोरांमध्ये चालतंच . सगळीच मुलं पक्या , पम्या , बाळ्या अशाच नावाची होती . त्यांची खरी नावं पण कुणाला आठवत नव्हती . फक्त रवींद्र नावाच्या मुलाला रव्या न म्हणता , ' रवळनाथ ' म्हटलं जायचं . पोरंच ती , काहीही चालायचं ! पण गणेशला मात्र आपल्या नावाचं ' गण्या ' रूप केलेलं चालायचं नाही " अरे , देवबाप्पाचं नाव आहे चांगलं , असं तोडू मोडू नका रे !" तो नेहमी सांगायचा . एकदा पोरं म्हणाली , " मग काय तुला गणपतीबाप्पा म्हणू कां ? " काही दिवस गण्याच्या ऐवजी गणपतीबाप्पा हाक मारली जाऊ लागली . त्याचंच संक्षिप्त रूप बाप्पा केलं गेलं . आणि मग गणेश सर्वासाठी बाप्पाच झाला . #सुरेखामोंडकर ९/३/२०१७
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा