#बाप्पाचा_गणपती_(भाग ३ )
.
.
. . तयार मूर्तीला बॉडी कलर देऊन झाल्यानंतर , बाप्पाला गणरायाला सजवायला खूप आवडायचं . उत्तम रंगसंगती साधून शेला , कद तो नयनरम्य करायचा . मुकुट , कंठी , गळ्यातले इतर दागिने , दंडावरचे , हातातले दागिने ,सोंडेवरचं नक्षीकाम , कोरीव प्रभावळ --महिरप ; सगळं बाप्पा मनापासून करायचा . लाल , हिरवे , डाळिंबी , हिऱ्यासारखे चमकदार खडे वापरून तो गणपतीबाप्पाचं सौंदर्य चमकवून टाकायचा .
.
. . मधल्याकाळात पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागला . पीओपी च्या मूर्ती विरूद्ध जनजागृती व्हायला लागली .पर्यावरण स्नेही मूर्तींची गरज आणि मागणी वाढली . पण पर्यावरण ऱ्हासाने सगळ्यांचाच घास घेतला होता . गणपतीसाठी लागणारी शाडूची माती दुर्मिळ व्हायला लागली . ही मूर्ती बनवायला खास कारागीर , कलाकार लागतो . साचा वापरून पीओपीची मूर्ती कोणीही , साधारण कसब असणारा बनवू शकतो . पण मातीचा गणपती बनवायला , मूर्तीकला अवगत असणारा खास कारागीरच लागतो . असे मूर्तिकार आता कमी झाले आहेत . शाडूच्या मूर्तीच्या काही मर्यादा पण आहेत . तीन फुटापेक्षा उंच मूर्ती बनवता येत नाहीत .त्या तडकू शकतात . त्यांचं वजन जास्त असतं . वाहतूक अवघड असते . ह्या सर्व समस्यांचं निराकरण करता करता मूर्तीची किंमतही वाढते . सर्वसामान्य गणपती कारखान्यांना ते परवडत नाहीत . त्यांच्या आवाक्या बाहेर जातात .
.
. . बाप्पाच्या घरी पीओपीच्याच साच्यातील मूर्ती हमरापूरहून आणल्या जायच्या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी रंगकामाचा मुहूर्त व्हायचा . एका वर्षी घरापासून काही अंतरावरचं जुनं , पडीक ग्यारेज त्यांना काही महिन्या पुरतं भाड्याने मिळालं होतं . ताडपत्र्या , जाड प्लास्टिकचे तागे लावून पाण्याचा थेंब आत येणार नाही ह्याचा बंदोबस्त केला होता . कडेने सर्व मजलेवाल्या घडवंच्या लावल्या होत्या . त्यावर पांढऱ्या रंगहीन मूर्ती हारीने मांडल्या होत्या . रंग , वर्ख , निरनिराळ्या आकाराचे ब्रश , स्प्रे , मूर्ती रंगवताना लागणारा गोल फिरणारा पाट , सर्व जय्यत तयारी होती .
.
. . अपरात्री गाढ झोपेत असताना , खोल विवरातून आल्या सारखा आवाज त्याच्या कानावर आदळला . " बाप्पा , उठ ! उठ ! अरे घुसमटतोय . नाकातोंडात पाणी शिरतंय . उठ , बाप्पा उठ ! " बाप्पा खडबडून जागा झाला . सगळं घर गाढ झोपलं होतं . बाहेर आडवा तिडवा पाऊस पडत होता . चाळीचे पत्रे थाडथाड उडत होते .त्यावर पावसाच्या धारांचा अक्राळविक्राळ थयथयाट चालला होता . बाप्पा हडबडला . " अशी कशी कळीकाळासारखी झोप लागली ? " त्याच्या डोक्यात क्षणार्धात विजा चमकल्या . तो ताडकन उठला . " देवा , देवा , अरे काय करून ठेवलंस हे ! माझा बाप्पा ... माझा बाप्पा ! " दिवा देखील न लावता त्याने दार उघडलं . ओट्यावर उंबरठ्यामुळे थोपलेलं पाणी भसकन आत शिरलं . तो पर्यंत गोंधळामुळे अख्खं घर जागं झालं होतं . घरातले दिवे लागले . अंधारातच , अनवाणी , ग्यारेज कडे धावत सुटलेल्या बाप्पाच्या मागे सगळं घर धावलं . धावता धावता शेजाऱ्या पाजार्यांच्या घराची दारं बडवत , हाकारे घालत सगळे धावत होते .
.
. . जमिनीवर फक्त सिमेंट ओतून तयार केलेल्या ग्यारेज मध्ये तळातून पाणी घुसलं होतं . घडवंचीच्या तळाच्या कप्यातील गणपतीच्या सर्व मूर्ती भिजल्या होत्या .सगळे चाळकरी मदतीला आले . उरीपोटी उचलून , मिळतील ती आच्छादनं घालून सर्व मूर्ती सुरक्षित जागी आणल्या .मिळतील त्या निवाऱ्याच्या जागी ठेवल्या . वाचवता येईल तेवढं इतर सामान वाचवलं . त्या वर्षी आलेला तो अवकाळी पाऊस दोन दिवस कोसळत होता . सर्वांच्या तोंडचं पाणी त्याने पळवलं .
.
. गणपतीच्याच कृपेने काम सुरु झालं . मुहूर्त गाठता आला . पण त्या दिवशी पाण्यात भिजल्यामुळे आई आजारी पडली . तिच्या प्रकृतीच्या काळजीपेक्षा सर्वांच्या मनात पहिली धास्ती उभी राहिली , ' आता स्वयंपाक कोण करेल ? चुली समोरच वेळ द्यावा लागला , तर वेळेवर गिर्हाईकांच्या मागण्या पूर्ण कशा करणार ? " आई बरी होतेय तोंवर नेमका मन्याला अपघात झाला . कळल्यावर ; कुठे , कसा , कितपत लागलंय ; हे सर्व मनात येण्याच्या आत , प्रथम डोक्यात विचार आला , " मरतोय की काय ? आता डोळे कोण रंगवणार ? " बाप्पाला मेल्याहून मेल्या सारखं झालं होतं . गणपती आपलं सर्वस्व आहे हे खरं आहे ; पण त्याच्या समोर मायेच्या माणसांची काळजी पण आपल्याला वाटू नये ? त्यांच्या प्राणापेक्षा आपल्याला आधी आपलं काम आठवावं ? एवढे आपण अमानुष , स्वार्थी कधी .. कसे झालो / बाप्पा शरमिंदा झाला ! देवाच्ग्या दयेनं सर्व व्यवस्थित झालं . आई स्वयंपाक करू शकली . डोळे मन्यानेच रंगवले , गिर्हाईकांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या . सगळ्यांना संतोष झाला . .पण बाप्पा स्वतःच्या नजरेतून उतरला . त्या नंतर तो पुन्हा कधी हमरापुरला गेला नाही . तिरीमिरीत त्याने निर्णय घेऊन टाकला . नकोच तो दरवर्षीचा ताप ! गणपतीचा कारखाना बंद झाला . #सुरेखामोंडकर ०९/०३ /२०१७
*क्रमशः