#काळाने_गिळले_सारे
.
.
आमच्या
गावात माध्यमिक आणि पुढील शिक्षणाची काही सोय नव्हती .
शिक्षणासाठी म्हणून गावाच्या बाहेर पडलो . शहराच्या अलिबाबाच्या
गुहेला बाहेर पडायची वाट नव्हती .
गोष्टीतल्या सिंहाच्या गुहेत जसे फक्त आत जाणाऱ्या प्राण्यांच्या
पावलांचे ठसे दिसायचे ; बाहेर येणारे ठसेच नसायचे , तसंच हे
शहराच्या बाबतीत सुद्धा !
.
. . खूप वर्ष गावाकडची याद सतावत होती . आज शेवटी आलोच गावी . सगळं बदललंय . माझं गांव मलाच ओळखता येत नाहीये . खाडीच्या काठाकाठाने शहराकडे जाणारा एक रस्ता होता . जाताना खूप दूर पर्यंत त्याने माझी सोबत केली होती ; पण ती खाडीच आता दिसत नव्हती . गडप झाली होती . खाडी , तळी , विहिरी सगळंच बुजवलं होतं . तिवरांची जंगलं , वाड्या , आमराया सगळं सफाचट झालं होतं . ह्या गगनाला भिडणाऱ्या इमारतींच्या जंजाळात मला माझं , लहानपणीचं छोट्ट घर शोधून काढायचं होतं . ज्या वाड्यात आम्ही तिन्ही त्रिकाळ उच्छाद घालायचो , तो पाटलाचा वाडा शोधायचा होता . समोरच एक पोलीस स्टेशन दिसलं . रम्याची आठवण आली . म्हटलं बघूया त्याचा काही ठावठिकाणा लागतोय का ! भेटला तर त्याच्याच संगतीनं गांव पालथा घालू . लहानपणी विटीदांडू खेळताना करायचो तसा . ह्याच पोलीस स्टेशन मध्ये तो होता .

. . शिरलोच आत मध्ये . कोणीतरी दखल घेई पर्यंत ,
भिंतीवर लावलेले गुन्हेगारांचे फोटो बघत बसलो . शेवटी हात हालवत
बाहेर पडलो . रम्या आता तिथे नव्हताच . पण पाटलाच्या वाड्याचा
मात्र पत्ता मिळाला . पोचलो तिथे . आबाबाबाबा ! वाडा कसला
बकिंगह्याम प्यालेसच होता तो ! पण आता तो पाटलाचा वाडा नव्हता ,
इनामदाराचा होता . पम्यापण दोस्तच माझा ! म्हटलं बघूया भेटतो का !
.
. . गेट वरचा दरवान पाहिल्यावर पोटात गोळाच आला . जुन्या सिनेमात दाखवतात तसा चंबळ च्या खोर्यातला डाकू वाटत होता . ह्या भल्यामोठ्या मिशा , त्यातच कानाशिलाकडचे कल्ले मिसळले होते , चेहराभर नुसत्या मिशाच मिशा .मनाचा हिय्या करून त्याला विचारलं . कायम पम्या म्हणायची संवय , त्याचं नावच आठवेना . शेवटी साहेब भेटतील का , म्हणून विचारलं . महालात फोन , नोंद वहीत संपूर्ण माहिती , मेटल डिटेक्टर मधून तपासणी , अंगाची चाचपणी असे सगळे सोपस्कार करून एकदाचा आत गेलो . माझी गाडी मात्र मला गेटच्या बाहेरच ठेवावी लागली .
.
. . जाताना दोन्ही बाजूला कमांडोंची कतार . दहशत बसेल असे एकेक चेहरे . महालात मात्र दिवाणखान्यातच शाही इतमानात पम्या बसला होता . मला पाहिल्या बरोबर , दोन्ही हात पसरून उठला , मला गळामिठी मारलीन . मी खुश , इतक्या वर्षानी देखील मला ओळखलं म्हणून आणि अचंबित ; पाचवीतच शाळा सोडल्या नंतर ह्याची स्मरणशक्ती एवढी कशी वाढली ह्या कल्पनेने . बोलता बोलता कळल त्याने अबराकाडबरा युनिवर्सिटीची डॉक्टरेट मिळवली होती .
.
. . माझं आगतस्वागत तर जंगी झालं . सोन्याच्या ट्रोली वर ठेवलेल्या सोन्याच्या टी सेट मधून मला चहा देण्यात आला . मी प्यायलो नाही , ओठ आणि जीभ भाजेल ह्या भीतीने ! बिस्किटं पण होती . ती देखील मी खाल्ली नाही . कोण जाणे , सोन्याच्या बिस्किटांना ग्लुकोज चा मुलामा दिलेला असायचा ! एक म्हणता दोन व्हायचं ! दाताचा तुकडाच पडायचा ! ट्रोली घेऊन आलेला माणूसही नखशिखांत सोन्याने लहडलेला होता . गळ्यात मनगटा एवढ्या जाडीच्या डझनभर सोन्याच्या चेनी , मनगटात , दंडावर , कमरे भोवती , बोटात , सगळीकडे निरनिराळ्या आकारात सोनंच सोनं . एवढंच काय त्याची स्लीपर देखील सोन्याची होती . हा चेहरा देखील मला ओळखीचा वाटला होता . एकाच वेळी भीतीने माझ्या पोटात खड्डा पडून त्यात वटवाघळ उडत होती ; मित्राचा उत्कर्ष बघून अभिमानाने भरून आलेल्या हृदयात फुलपाखर उडत होती ; मेंदूत नाना विचारांचा गुंता होऊन , त्यात कोळी कोळिष्टके करीत होता . .
.
. . एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला . अरेच्या ह्या सगळ्यांचे फोटो मी पोलीस स्टेशनच्या भिंतीवर wanted च्या यादीत पाहिले होते .हा चहा देणार्याचा फोटो गंठण आणि चेनी खेचाणार्यांच्या विभागात होता . मी बाहेर जाण्यासाठी धडपडून , गांगरून उभा राहिलो . पम्या मात्र चाणाक्ष , अंतर्ज्ञानी . त्याने माझा जांगडगुठ्ठा बरोब्बर ओळखला . माझ्या पाठीवर थोपटत म्हणाला , " तुला वाटतंय ते खरं आहे . अरे हे सगळे गुन्हेगार माझ्या चाकरीला आहेत म्हणूनच तर पोलिसांना सापडत नाहीयेत . मी त्यांना मोठ्या उदार मनाने आधी माझ्याच घरात कामाला ठेवलेत . आता हळूहळू मी त्यांना सुधारणार आहे . माझ्याच घरात असल्यामुळे मला ते सोपेही जाणार आहे . नाहीतर कुठे शोधत फिरू मी त्यांना सुधारण्यासाठी !! मित्रा एक लक्षात ठेव सज्जन ..दुर्जन ; सत्य .. असत्य ..." तो थोडा घुटमळला
" पुण्य ... पाप ; चांगले ... वाईट " मी म्हणालो .
.
.तो हसला ! खळखळून , गडगडून आणि म्हणाला , " शाब्बास ! तर मी काय म्हणत होतो , ह्या सगळ्यांमध्ये नेहमी सज्जन , सत्य , पुण्य , चांगले ह्यांचाच विजय होत असतो . दोस्ता , अंतिम विजय आपलाच आहे . " मला त्याची तळमळ कळत होती . त्याची कळकळ माझ्या जिव्हारी जाऊन पोचली होती .
.
. मी मुंडी हलवली .पुन्हा पम्याने मला मिठी मारली . कमांडोंच्या पहाऱ्यातून मी बाहेर आलो . दरवानाने गेट उघडलं . मी माझ्या गाडीकडे वळलो .... आणि मटकन खालीच बसलो . गाडीची चारी चाकं , स्टीअरिंग व्हील , डेक सगळं चोरीला गेलं होतं . सैरावैरा धावतच मी पुन्हा महालाच्या गेट कडे वळलो . गेट बंद होतं ,पण दरवानाच्या चौकीत मला एकावर एक ठेवलेली चार चाकं आणि इतर वस्तू दिसत होत्या .
.
. मी दाणदाण गेट वाजवायला सुरुवात केली . कोणीही माझी दखल नाही घेतली . कमांडोंची ट्रिगर वरची बोटं मला दिसली . मी मुकाट्याने खाली मुंडी घालून रस्त्यावर आलो . आता काय करावं बर ! रिक्षाने जवळच्या पोलीस स्टेशन वर जावं की शहाण्यासारखं एखादं ग्यारेज गाठावं ? काहीही करायचं तर पैसे तर हवेत ! मी खिशात हात घातला आणि ....
.
. . पम्याच्या गळामिठीचं रहस्य मला कळल . पैश्याचं पाकीट गुल झालेलं होतं . मी कपाळावर हात मारला आणि स्वतःला कोसत , पाय फरफटवत , समजुतदारपणे स्टेशनच्या दिशेने चालायला सुरुवात केली .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा